संत गाडगेबाबा स्व. रामप्रकाश शामलालजी राठी स्मृती शिष्यवृत्ती योजनाImportant Notice : * अर्ज सादर करावयाची अंतिम तिथी हि १० डिसेंबर २०२१ आहे. *

संत गाडगेबाबा स्व. रामप्रकाश शामलालजी राठी स्मृती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सूचना :
(१) सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या स्थानिक महाविद्यालये / संस्था / विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग / घटक महाविद्यालये / स्वायत्त महाविद्यालय येथे पदवी अभ्यासक्रमांना नियमित प्रवेशित असावा.
(२) सदर योजना ही इयत्ता १२ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या व ६० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता असून सदर विद्यार्थी हा चालू सत्रामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये बी.ए. भाग-१ या वर्गात प्रवेशित असावयास पाहिजे.
(३) अर्जदाराला अर्जातील संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे.
(४) अर्जदाराने फोटो व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ते अर्जा सोबत जोडणे अनिवार्य आहेत.
(५) या योजनेची महाविद्यालयाच्या मार्फत विद्यापीठात अर्ज सादर करावयाची अंतिम तिथी हि १० डिसेंबर २०२१ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सदर अर्ज त्या पूर्वी सादर करणे अनिवार्य आहे.